शुक्रवार, १५ जानेवारी, २०२१

🚀कश्यासाठी🚀

दाेन नेत्र दाेन कर्ण

दाेघांचेही एकच मर्म,

दाेन जिवांच्या रेशीम गाठी

हा विरह कश्यासाठी,!!


भाकरी खाऊन माणूस जगताे

कागद खाताे गाढव,

नाण्यांनाही गंज लागताे

हा माेह कश्यासाठी,!!


पृथ्वीवर देश बनवले

देंशाचे ही राज्य,

राज्यांच्या जिल्हे पाेटी

हे तुकडे कश्यासाठी,!!


आभाळ माया करी प्रसन्न

वितभर पाेटासाठी अन्न,

घर सावली साठी

हा हव्यास कश्यासाठी,!!


 निर्सगाने  सृष्टी सजवली

माेफत सेवा तुुम्हा अर्पीली,

सत्यसाेडूनी अंधळ्याचीकाठी

कुत्रीम कश्यासाठी,!!


ज्याने सृष्टीरचली ती ब्रम्हाची

तुझे नी माझे काहीच नाही,

विज्ञानाने सर्व मिळवले

पण अमृत मिळणार नाही,!!


  कवि-- नवनाथ ठोंबरे

--------------------

1 टिप्पणी: