तू अन् मी,
फक्त तू अन् मी.
नकोत कोणी बाजूला,
नकोत कोणी साथीला.
कधी कडकडीत उन्हात,
कधी मुसळधार पावसात,
तर कधी थंड गारव्यात,
तुझीच हवी मज साथ.
कधी विमानी अंतराळी,
कधी ट्रेन मध्ये संध्याकाळी,
कधी बस मध्ये सकाळी,
तर कधी सुंदर नौकेत जळी.
जशी साथ तुझी सुखात,
पूस डॊळे माझे दुःख्खात.
एक आपण सुख दुःख्खात.
तुझ्या कुशीत, मी सुखात.
हा प्रवास दोघांचा !!
आहॆ सप्त जन्मांचा.
युगामागुनी युगे लोटली,
तरी प्रीत ही ना सरली.... !!
नवनाथ ठोंबरे पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा