शुक्रवार, १५ जानेवारी, २०२१

बालपण.......

 #बालपण

वयचं असतं हे..... 


खेळायचं,बागडायचं,

थोडं खळखळून हसायचं,

थोडं हिरमुसून रडायचं.


वयचं असतं हे.....


नको त्या गोष्टींचा हट्ट करायचं.

तो रूसणारा चंद्र,

ती हसणारी चांदणीही 

माझीचं म्हणायचं.


वयचं असत हे.....


निरागसता ओसांडून वाहण्याचं

भलेबुरे काय ते न समजण्याचं.

दबक्या पाऊलांनी येऊन 

डब्यातला खाऊ चोरायचं,

नंतर आईच्याच पदराआड लपायचं.


वयचं असतं हे.....


खोड्या काढायचं

नाक मुरडायचं

कोपऱ्यात जाऊन गाल फुगवून बसायचं.


वयचं असत हे.....


सर्वांभोवती घिरट्या मारण्याचं.

बोलका पोपट होऊन सर्वांना आपलंस करायचं.

वयच असतं हे.....


कवी - नवनाथ ठोंबरे...😊

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा