गुरुवार, १४ मार्च, २०१९

किती माझे भाग्य आई वडील आले माझ्या वाट्याला.......

बंगला गाडी गेली वाटनित मोठ्याला
घराजवळची बाग मिळाली धाकट्याला
सुपीक शेतीची जागा दिली छोट्याला
किती माझे भाग्य आई वडील आले माझ्या वाट्याला

पंच जमले होते आम्ही वाटणी करतांना
आगीत तेल घालत होते आम्ही भांडताना
आम्ही उत्सुक होतो हिस्सा मांगताना
त्यांना आनंद होत होता घर विभागलेले दिसंताना
सगळ्यांनी धन संपत्ती हवी होती मोठ्याला
किती  भाग्य आई - वडील आले माझ्या वाट्याला

संपत्ती  नावावर करण्याची प्रत्येकाला झाली होती  घाई
आम्हाला कोण सांभाळेल या आशेने  बघत बाबा आई
आई बाबा माझ्याकडे चला म्हणायला पुढे कोणीच सरकला नाही
मला कळताच नव्हत माझ्या वाट्याला येईल काही
डाग दागिने  आईचे दिले पंचानी  धाकट्याला
किती माझे भाग्य आई वडील आले माझ्या वाट्याला

सगळे खुश झाले बनून करोडपती
फक्त आई - वडील हीच माझी मोठी संपत्ती
आई -वडिलाच्या आशीर्वादाने मला मिळाली सुख शांती
शेवटी आई - वडिलांचा आशीर्वाद येईल कामी अंती
 किती नशीबवान मी काहीच कमी नाही माझ्या साठ्याला
किती माझे भाग्य आई वडील आले माझ्या वाट्याला

                                                                                           नवनाथ ठोंबरे
                                                                                             औरंगाबाद

1 टिप्पणी: