मोठं झालेल्या प्रत्येकाला
मधली सुट्टी हवी असते
जुन्या आठवणींच्या बाकावर
शाळा नेहमी नवी असते
फळ्यावरच्या नावाची भिती वाटावी
असा कुणाचा धाक नाही आता
खुशाल चेंडू मस्ती करावी
असा शाळेचा बाक नाही आता
इंग्रजीच्या नावाने बोबडी जेव्हा वळायची
आई शपथ सांगतो मातृभाषेची किंमत
आम्हाला त्याच वेळी कळायची
शाळेपासून प्रेम टिकलं अशी
मोजकीच जोडपी होती
आणि रक्षाबंधनामुळे मामा झालेल्याची
मात्र हजारोची रांग होती
टपरी शिट्ट्या भंकस मस्ती
यात नेहमीच पुढे आमचा मागचा बाक
कुणालाही कमी लेखत नसतो
खुशाल काढायचे एकमेकांचे बाप
साइन , कॉस, थिटा जस सेकशनला तोटा
अल्लडच्या वयात अत्तर छाया दरवळायचा
गणिताचा त्रास सुद्धा मग हवा हवासा वाटायचा
नवनाथ ठोंबरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा