पदराला बांधुन सुख
दु:ख साऱ्याचे पुसते
भरल्या डोळ्यांना लपवत
साऱ्याच्या सुखासाठी हसते
ती स्त्री असते
राधा वाढा , उष्टी काढा
यालाच संसार मानते
झेलून वेदनेचा डोंगर
ममतेचे गीत गाते
ती स्त्री असते
बाबांची परी , आईची छकुली
भावाची लाडली होते
आजी - आजोबांची धाकुली
कधीतरी मग परकी होते
ती स्त्री असते
एकाच जन्मात ती
दोन जीवन अनुभवते
माहेरात आपुलकीचे झाड लावते
सासरची शीतल सावली होते
ती स्त्री असते
कणखर ती
कधी जिजाऊ , कधी झाशीची राणी होते
इतके सगळे सहन करून
बाकीच्यांना ती प्रेरित करते
ती स्त्री असते
रडते ती , कुढते ती
ती खूपच हळवी असते
सगळ्यांनीच सोडला धीर
तेव्हा मात्र खंबीर असते
ती स्त्री असते
नवनाथ ठोंबरे (औरंगाबाद)
दु:ख साऱ्याचे पुसते
भरल्या डोळ्यांना लपवत
साऱ्याच्या सुखासाठी हसते
ती स्त्री असते
राधा वाढा , उष्टी काढा
यालाच संसार मानते
झेलून वेदनेचा डोंगर
ममतेचे गीत गाते
ती स्त्री असते
बाबांची परी , आईची छकुली
भावाची लाडली होते
आजी - आजोबांची धाकुली
कधीतरी मग परकी होते
ती स्त्री असते
एकाच जन्मात ती
दोन जीवन अनुभवते
माहेरात आपुलकीचे झाड लावते
सासरची शीतल सावली होते
ती स्त्री असते
कणखर ती
कधी जिजाऊ , कधी झाशीची राणी होते
इतके सगळे सहन करून
बाकीच्यांना ती प्रेरित करते
ती स्त्री असते
रडते ती , कुढते ती
ती खूपच हळवी असते
सगळ्यांनीच सोडला धीर
तेव्हा मात्र खंबीर असते
ती स्त्री असते
नवनाथ ठोंबरे (औरंगाबाद)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा