जात होती ती हरवून
दारूच्या वासानं आता
आयुष्य गेलं करपून
तिला' नेहमी वाटायचं
त्यांनी मनातलं ओळखावं
पण तिने सागिंतलेले
त्याला कधी कळाव
न केलेल्या चुकांसाठी
त्यान तिला छळाव
साऱ्यांच दु;ख ते
तिच्या अश्रूतून ढळाव
स्वत:च्या धुंदीतच
जात होता त्याचा वेळ
जमा खर्चाचा आता
लागत नव्हता मेळ
मनातली सुंदर स्वप्न
पाहत होती ती दुरून
दारून आयुष्य गेलं करपून
जात होती ती हरवून
दारूच्या वासानं आता
आयुष्य गेलं करपून
पदरात पडले ते गोड मानत होती
जगण्यासाठी रोज नव कारण शोधत होती
मनाला आता रमवते दु:ख बाजूला सारून
सहन करते सगळ जगते भावनांना मारून
आशा तिला प्रकाशिल जीवन निराशेचे ढग हरवून
दारूच्या वासानं आता आयुष्य गेलं करपून
हळूहळू बदलत गेली तिची अन त्याची भाषा
तिची अन त्याच्या आयुष्याचा तमाशा
चेहरा खरा लपवत होती जरी ती हसली
मनातलं दु:ख नव्हती गालात लपवू शकली
डोळ्यातलं पाणी तिच्या गेलं आता पार सुकून
दारूच्या वासानं जणू आयुष्य गेलं करपून
नवनाथ ठोंबरे (औरंगाबाद)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा