खर सांगते बरा आहे
नवरा माझा नवरा आहे
थोडासा तो कोडगा आहे
जणू माझा पोरगा आहे
कधी तो माझा पप्पा आहे
मनातला नाजूक कप्पा आहे
थोडासा चिडका आहे
पण मायेचा झरा आहे
खर सांगते बरा आहे
नवरा माझा नवरा आहे
लहानशी त्याची गट्टी आहे
पण थोडासा हट्टी आहे
त्याला वाटत तो धाडसी आहे
मला वाटत तो आळशी आहे
थोडासा तो हळवा आहे
माझ्या जीवनातला वारा आहे
खर सांगते बरा आहे
नवरा माझा नवरा आहे
थोडासा तो भावनिक आहे
राग त्याचा क्षणिक आहे
नव्या कल्पनेत उडणारा आहे
जुन्या आठवणीत रमणारा आहे
नव्या स्वप्नात रंगणारा आहे
त्याच्यामुळे सौख्य घरा आहे
खर सांगते बरा आहे
नवरा माझा नवरा आहे
थोडासा तो ज्ञानी आहे
सुखी आणि समाधानी आहे
संयम थोडासा कमी आहे
जिभेने थोडा कडवा आहे
पहिल्यापेक्षा बरा आहे
मी कुठ म्हणते हिरा आहे
खर सांगते बरा आहे
नवरा माझा नवरा आहे
नवनाथ ठोंबरे (औरंगाबाद)
९०२१०२४८२१
Nice bhavji
उत्तर द्याहटवा