गुरुवार, २८ डिसेंबर, २०१७

ती सध्या काय करते...?हो तीच ती

ती सध्या काय करते...?
ती गर्भात असतानाच तपासली जाते..
एखादीच ती अनेक यातनातुन जन्म घेते..
ती हासते, बागडते आईच्या कुशीत
पण ते तीचे हसणे बागडणे कुशीतच संपते...
आणि वयाबरोबर बनत जाते ती आस्मीता, खानदान की ईज्जत वगैरे...
मग ती जीवंतपणी बनते गुलाम पुरुष नावाच्या प्राण्याची...
तो कधी बाप असतो, कधी भाउ असतो, कधी प्रीयकर असतो तर कधी नवरा...
हे सर्व तीला वापरतात आपले पुरुषी नाते आबादीत करन्यासाठी...
आणि हेच पुरुषी षंढ पुन्हा दुसर्या घरातील ती हल्ली काय करते विचारत रहातात...
हो पण ती थांबली नाहीये ती लढलीय आणि लढतेय देखील...
विनाकारण होनार्या स्पर्षासोबत, ती लढतेय छाताडावर टपलेल्या वासनांध नजरेसोबत, ती लढतेय खानदान की ईज्जत नावाखाली लाउन दिलेल्या लग्न नावाच्या टाकाउ परंपरेसोबत...
हल्ली ती काय करतेय...
ती सुनीता विल्यम्स झालीय
ती कल्पना चावला झालीय
ती सायना, सानीया झालीय
तरीही आपन तीच्यात सनीच शोधत विचारतो
हल्ली ती काय करते....
हल्ली ती फक्त गर्भातच नाही मारली जात
तर ती रोज मारली जातेय परंपरेने...
तीच्यावर कुठला एक नराधम नाही करत बलत्कार तर त्या नराधमाने केलेल्या बलत्काराची पायरी करुन चढतात तीच्यावर हजारो राजकीय ईमले...
हल्ली ती काय करते...
ती पल्लेदार, अस्मीतावाचक भाषनाचा ती विषय बनलीय...
मेलेल्या चीतेवर पोळ्या भाजन्यासाठी ती एक साधन बनलीय...
हो तीच आई, बहीण, मैञीण, प्रेयसी आणि बायको
रोज राञी समाजमान्य बलत्कार स्वीकारुन
जन्मदेतेय जाती,धर्म, फालतु आस्मीता, देव, दंगे यात गुरफटलेल्या क्रियाशुन्य भावनीक समाजाला....
हल्ली ती विनाकारण हसन्याचा प्रयत्न करते...
बापाच्या ईज्जतीसाठी नवर्याच्या छळाला सहन करत...
कारण तीचं अस्तीत्व दोन घराच्या बाहेरसुध्दा आहे याचा तीला कुणी विश्वासच देत नाहीये..
तीने काहीही केले तरी तीला विचारलेच जाते...
हल्ली ती काय करते....?

गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०१७

किती बर झाल असत.................|

किती बर झाल असत
 जर तिने हि थोडस मला समजावून घेतलं असत
मी तिचे सर्व ऐकून घेत  असताना
तिने हि थोडस माझ ऐकून घेतलं  असत

जगातील प्रत्येक आनद मी
 तिला देण्याचा प्रयत्न करतो
असा  थोडा प्रयत्न तिनेही केला असता
 तर किती बर झाल असत

 माझ हृदय तिच्या  प्रेमाने  भरून
 गेल असत
 मग या  जगात  काहीच  कमी
 जाणवल नसत
 सगळ्यांनी दूर केले तरी ती माझ्यातल
आहे यातच  सर्व समाधान  मानल असत

किती बर झाल असत
मी केलेली कविता वाचून जर
तिला माझ  मन कळाल असत
तर खरच किती बर झाल असत



 नवनाथ ठोंबरे  पाटील
     औरंगाबाद 

कसे सांगू मी ते तुला............|

कसे सांगू मी ते तुला
कॉलेजच्या त्या दिवसात
भेटलीस  तू मला
 पाहता पाहता बघत राहिलो
तू मला नि मी तुला
झाली मैत्री पक्की
नि वर्ष ओलाडले
बघता  बघता  राहून गेले
बोलयाचे  मनातले
 कसे सांगू मी ते तुला
कधी भेटतेस कधी  बोलतेस
मनमोकळ्या पणाने सर्व सागतेस
आज जेव्हा विचार करतो  तुझा
फक्त नि  फक्त दिसतो
हसरा चेहरा तुझा
आठवतो जेव्हा मी तुला
रडत एकांकात माझ मन
आता झालीस तू माझ्यापासून दूर
 राहिली फक्त तुझी आठवण
कसे सांगू मी ते तुला
कसे सांगू मी ते तुला




                                           नवनाथ ठोंबरे पाटील
                                                  औरंगाबाद

रविवार, १ ऑक्टोबर, २०१७

यदा-कदाचीत असे घडावे,
मलाही वाटते की प्रेमात
पडावे.
कोणावरतरी निस्वार्थी प्रेम करावे,
आणि तीच्यासाठी मीही किँ तसे
... झूरावे.
महिन्यातून एकदा तीने उगाचच रूसावे,
आणि मी मनवता-मनवता खुदकन हसावे.
राञभर फोनवर तीने मला सतवावे,
दिवसभर मी तीला भेटीसाठी पटवावे.
कुठेतरी एकांतात चोरून भेटावे,
आणि जान्यासाठी घाई म्हणून
मी तीच्यावर रागवावे.
दोन दिवस अबोला पाळुन
एकमेकांना आठवावे,
मग छोटेसे प्रेमपञ तीने मला पाठवावे.
यदा-कदाचीत असे घडावे,
मलाही वाटते की प्रेमात पडावे. 


बुधवार, २७ सप्टेंबर, २०१७

आई.............................

आई  आई  आई
अनावर होतो भाव
पायामध्ये काटा टोचतात
तुझेच ओठी नाव
आई जवळ असली
तर येते हिंमत
ती दूर गेल्यावर कळते
तिची आपल्याला किंमत
आई म्हणजे काया,
आई म्हणजे छाया
तिच्या कुशीत गेल्यावर कळते
आमच्या वरची तिची आपुलकी माया
प्रेमळ माझी आई
शाळेला पाठवयाची  करते घाई
माझे मित्र म्हणतात  तिला आई
तिचे वर्णन करते माझी ताई
ती जवळ नसताना आठवण मला येई
जिच्या कुशीत मी झोपतो तीच माझी आई .................तीच माझी आई

नाही रे ................. नाही कुणाचे कोणी

नाही रे..............नाही कुणाचे कोणी
नाही रे ......... नाही कुणाचे कोणी 
अंती जाईल एकटाच  
माझे -माझे म्हणुनी
माझे नाही रे कोणी 
नाही रे .............नाही कुणाचे कोणी 
नाही रे ......... नाही कुणाचे कोणी 
हि बहिण कुणाची ,भाऊ कुणाचा 
कोण कोणाचे सगे सोयरे
मेल्या मागे सर्व राहिले 
तुटतील धागे दोरे 
नाही रे नाही कुणाचे कोणी 
हि दोन दिवसाची  तुझी जवानी 
पुढे नाही टिकणार रे
मेल्या मागे सर्व राहिले 
तुटतील धागे दोरे 
नाही रे..............नाही कुणाचे कुणी 
नाही रे ......... नाही कुणाचे कोणी







                        

सोमवार, १४ ऑगस्ट, २०१७

असे आहे आयुष्य ........

आयुष्य भर सोबत असून 
जवळ कधी बसत नाही 
एकाच घरात राहून 
एकमेकास  दिसत नाही 
 हरवला तो आपसातला 
 जिव्हाळयाचा  संवाद 
एकमेकास दोष देऊन 
नित्य चाले वादविवाद 
धाव धाव धावतो आहे 
 दिशा मात्र कळत नाही 
ह्रदयाचे पाऊल कधी
 ह्रदयाकडे  वळले नाही 
इतके जगून झाले 
 पण जगायला वेळ नाही 
जगतो आहोत  कशासाठी
 कसलाच काही मेळ नाही 
क्षण एक येईल असा
 घेऊन जाईल हा श्वास
 अर्ध्यावरच थांबलेला 
असेल  हा जीवन प्रवास 
अजूनही  वेळ आहे 
थोड तरी जगून घ्या 
 सुंदर अश्या या जगण्याला 
डोळे भरून बघून घ्या 




                                                        नवनाथ ठोंबरे 

रविवार, १६ जुलै, २०१७

आयुष्याचे पुस्तक


आयुष्याच्या पुस्तकाचे
पुढले पान कोरे आहे,
अंतरीच्या लेखणीने रंगण्याची
वाट पाहत आहे !
सुंदर काव्य-कथा, निसर्ग चित्रणे,
स्वप्नीची नक्षत्र-नक्षी रेखणे आहे,
अंतरीच्या रसिकतेने नटण्याची
वाट पाहत आहे !
पिंपळ पान, गुलाब पाकळ्या,
मोरपीस, पराग जपणे आहे,
अंतरीच्या मायेने गोंजारण्याची
वाट पाहत आहे !
ज्या गत पानांवर अश्रू ठिबकले,
तिथली शाई मिटली आहे.
त्या पानांस का व्यर्थ वाचणे?
विरण्याची वाट पाहत आहे !
                                                                        कवी- नवनाथ ठोंबरे
                                                                              औरंगाबाद

गुरुवार, १३ जुलै, २०१७

तुझे शहानपण.......

कितीक हळवे, कितीक सुंदर, किती शहाणे अपुले अंतर
त्याच जागी त्या येऊन जाशी माझ्यासाठी माझ्या नंतर

अवचित कधी सामोरे यावे
अन्‌ श्वासांनी थांबून जावे
परस्‍परांना त्रास तरीही परस्‍परांविण ना गत्‍यंतर

मला पाहुनी दडते, लपते
आणिक तरीही इतुके जपते
वाटेवरच्या फुलास माझ्या लावून जाते हळूच अत्तर

भेट जरी ना या जन्‍मातून
ओळख झाली इतकी आतून
प्रश्‍न मला जो पडला नाही, त्याचेही तुज सुचते उत्तर

मला सापडे तुझे तुझेपण
तुझ्याबरोबर माझे मीपण
तुला तोलुनी धरतो मी अन्‌ तूही मजला सावर सावर

मेघ कधी हे भरून येता
अबोल आतून घुसमट होता
झरते तिकडे पाणी टपटप आणि इकडे शाई झरझर
   

                               नवनाथ ठोंबरे 

मंगळवार, २७ जून, २०१७

एक शिवरत्न



                                                                                      एका  राजाच्या घरी एक साधू गेला , राजा ही अधिकारी  आणि साधू हि अधिकारी आहे साधू संन्यासी आहे , सर्व परिक्षेत  उत्तीर्ण  झालेला  असा  एक संन्याशी
 सकाळी  पावणे सहा वाजता ,सूर्याचा उदय होत आहे त्या वेळेला संन्याशी दारात आहे ,
संन्याशी - भिक्षा देई  मा
राजाने आई जगदंबेची  पूजा नेटकीच आटोपली होती .  खिडकीतून पाहिलं ,सूर्याचा उदय झाला  दारात  संन्याशी आलाय .
राजाने आपल्या आईला विचारलं
 माय  दारात एक संन्याशी आलाय  त्याला काय  द्यावं  (ती बाई अधिकारी   बाई होती )
त्या बाईने  आपल्या  पुत्राला  सांगितलं बाळा इतका  जर  अधिकारी संन्यासी असेल  तर आपणचं  त्यांच्या झोळीत बसूंना ...
आईचे शब्द कानावर  पडलेच्या नंतर त्या राजाने  कंकाला  बोलावून घेतले (कंक म्हणजे हिशोब  करणारा )
कोरा कागद  त्याच्यापुठे  टाकला . जितके  गड  ताब्यात  आहे , आपल्याकडे  घोडे  किती आहे ,हत्ती किती आहे शिलिका किती आहे  ,पालख्या  किती आहे ,जमीन आपल्या ताब्यात  किती आहे आणि रयत  किती आहे सर्व त्या कागदावर  लिहले खाली स्वाक्षरी  केली आणि राजाची मुद्रा मारून दिली आणि पूर्ण स्वराज्याचा कागद संन्याशाच्या झोळीत टाकला  त्या संन्यास्याचे नाव आहे ...समर्थ  रामदास स्वामी
संन्यास्याने कागद  वाचला ..... कागद वाचत असताना  डोळ्यातून पाणी  आले
राजा शिव छत्रपतीला  सांगितलं महाराज आम्हाला काय करायचं  हे सर्व 
 त्या संन्यास्याने  कागदाचे हजारो  तुकडे केले हि ज्याच्या हृदयाची भूमिका आहे
त्यांना माझा मानाचा मुजरा  मानाचा मुजरा  …………………………….|


                                                                                                           

                                                                                                
                                                                                                 ( लेखक )
                                                                                         नवनाथ अंबादास ठोंबरे
                                                                        छत्रपती शाहु कॉलेज ऑफ  इंजिनिअरिंग , औरंगाबाद

सोमवार, २६ जून, २०१७

ती...........................|










परवा  स्टेशनवर ती भेटली
एस पी कॉलेजची क्लासमेट कूठली
आता फारच बदलेली दिसली
गालातल्या गालात खुदकन हसली
अचानक माझ्या समोर ती  आली
नजरा नजर  फक्त तिने केली
मन माझं रड्त होतं
भान मात्र तिचच होतं
डोळे तिचे स्थिर होते
विचार फक्त माझेच होते
तितक्यात रेल्वेचा हॉर्न तो वाजला
मनात विचारांचा गोधंळ तो साचला  
रेल्वे जवळ जवळ येत होती
तिच्या विचारांची धावपळ चालूच होती
न  बोलताच ती रेल्वेत चढली
भर पावसात घश्याला कोरड  पडली……………………………………….
कारण  सांगु मित्रानो  
त्यांच्यामध्ये मैत्रीच्या पलिकड्च प्रेमाच नातं होत ................................................

कवी - नवनाथ ठोंबरे  पाटील
औरंगाबाद
                                                                                               


                                                                                               

एका मुलीने आपल्या वडिलाना लिहलेले एक पत्र

                                
                   प्रिय बाबा , तुम्हाला पत्र लिहायची वेळ येईल अस मला  वाट्ल  नव्हत ,कारण तुम्ही घरी आले की दिवसभर जे काय घड्ल तुम्हाला  सांगायची सवय आहे, मला लहानपणापासुन......
पण आज जे सांगायचय आहे , ते मी तुमच्याशी बोलू शकले नसते बाबा माझा जन्म झाला , तेव्हा आजी म्हणाली होती की
पहिली बेटी आणि धनाची पेटी
            तुम्ही सुध्दा हसला होतात पण मला माहिती आहे तुम्हाला खूप टेंशन आल होत , ते येणारच होत  कारण  गरीब  बापाच्या  घरात मुलगी जन्माला आली कि , त्या मुलीच्या बापाला दोन एक्कर शेतीचा तुकडा  तिच्या नावे लिहूनच ठेवावा लागतो . तिच्या हुंड्याची सोय म्ह्णुन.................
मराठी मध्ये  एक म्हण आहे की मुलगी एक ओझ असते, ते परक्याच धन असते ” मुलीच्या बापाला अंगावर आलेला फोड जसा-जसा मोठा होत जातो , तेव्हा तश्या वेदना आपली मुलगी मोठी होत असताना होतात.
बाबा तुम्ही कधी दाखवल नाही पण तुम्हाला २४ तास माझ्या लग्नाची चिंता असते.. माझ्या लग्नाच्या काळजीने तुम्ही बैल सुध्दा  विकत घेतला नाही पण चार वर्षापासून माझ्या करता एक बैल शोधत फिरताय.............
                                                        कुणासाठी  बाबा आणि का..................?
दादाने परिस्थितीला कंटाळून आत्मह्त्या केली , वाहिनी मात्र अजुन जगतेय मुली सांभाळत , परिस्थिती फक्त दादाला दिसत होती . वहिनीला फक्त  मुली दिसतात  त्याचे भुकेले चेहरे दिसतात. ती पण एक मुलगी आहे , आज नवरा अर्धवट साथ सोडुन गेला तरी  तिला तिच्या मुलीसाठी  जगावच लागेल.
   बाबा .......   मुलगी हि एक  दावणीला बांधलेली गाय असते  लग्नाआधी माहेरी आणि लग्नानंतर सासरी  ,  सासरच्या लोकाना घरासाठी कुलदिपक हवा असतो.  मुलगा जरी वंशाचा  दिवा  असला तरी मुलगी हि त्या दिव्याची वात आहे  कारण वात हि शांतपणे जळत राहते.
 तुम्हीच बघा की आजवर कित्येक बाप आपल्या मुलीला जन्माच्या अगोदरच मारून टाकतात ,कारण की त्यांना तिच्या हुंड्याची चिंता असते .......
पण खर सांगू बाबा .......
जगाच्या पाठीवर अशी एक राजमाता जिजाऊ होऊन  गेली जिने  एक शिव –छत्रपती राजा  घड्विला , त्या राजाने एक स्वत;चे  हिंदवी स्वराज्य स्थापन केले.  जगाच्या पाठीवर अशी एक आई होऊन गेली  तिने  डॉ. बाबासाहेब आबेड्करासारखे   रत्न्न, जन्माला घातले  कि त्या माणसाने या भारत देशाची राज्य घटना लिहली. तर एक महिला महामहिम राष्ट्रपती  प्रतिभाताई  पाटिल होऊ शकतात.  तर प्रतिभाताई पाटिल  याच्या व्यक्तिमत्त्वातुन भारतीय नारीला असा संदेश मिळतो.  भारतीय नारी तिला म्हणतात
 आले‌‌‌ गेलेल्याचा आदर, जी करते सगळ्याची कदर, जी घेते नेहमी डोक्यावर पदर, तिलाच म्हणतात इंडियन मदर” 
ह्या  सर्व मुलीच होत्या मग  तुमच्या घरात मुलगी का नको ?
तुम्ही जाहिराती बघा मुलगी शिकली तर प्रगती झाली  , तुमच्या प्रगतीसाठी तुम्ही आम्हाला शिकवणार  आमची इच्छा म्हणून नाहीएक मुलगी शिकली तर सगळ घर शिकेन  म्हणजे  मुलगी शिकुन काय करणार  तर घरच्याना शिकवत बसणार  फक्त.......
तिला स्वत:च काहीच  करिअर नाही. बाळाला वर्षभर  दुध पाजा असे हक्काने म्हणतात ना जाहिरातीत.  मग मुलीला तिच्या अन्नासाठी जगु द्या  अस  का नाही म्हणत.  उद्या लग्नाला मुली मिळणार नाही म्हणुन मुली वाचवा पण मुलगी जरी वाचवली , तिचा हुंडा थोडीच वाचणार आहे  तो  तर द्यावाच लागणार  आज पर्यत  कित्येक  संसार  उध्दस्त झाले या हुंड्यासाठी , किती तरी मुलीचे प्राण गेले . याला कोण जबाबदार   आहे ,
खर तर  कायद्याने  हुंडा देणे किंवा घेणे  बंदी  आहे , पण तरी ही घेतला जातो.
बाबा मी लहानपणी लग्नच करणार नाही अस म्हणायचे तर  तुम्ही हसायचा  आणि म्हणायचे की  नाहिस करायच लग्न  माझी बेटी माझ्याकडे राहणार............. तुम्ही फक्त माझी समजुत  काढत  होतात  पण आता तुम्ही फार घाई करताय माझ्या  लग्नाची ?
बाबा तुम्ही ५०रु मध्ये एक माठ आणला ना तर तो ४ ते ५  वर्ष थंड पाणी देतो आपल्याला पण ४‌‌ ते ५ लाख हुंडा देऊन तुम्ही  जो  माठ शोधताय ना तो कधी पाणी तरी पाजणार आहे का तुम्हाला ..........जो मुलगा  माझ्या बापाचा कष्टाचा पैसा हुंडा म्हणुन घेणार  आहे  तर त्याच्या गळ्यात मी फुल- हार कसा घालु.
आपल्या देशातील  सगळ्या मुलीनी ठरवलय की हुंडा देऊन आम्ही लग्न करणार नाही  आता चार – दिड शहाने  बैठकीला बसतील आणि आमची किमत ठरवतील   पण आम्ही ते सहन करणार नाही.
आज मी पत्र  लिहलय उद्या या भारत देशातील  प्रत्येक  मुलगी  पत्र लिहणार आहे की, आम्ही हुंडा देऊन लग्न करणार नाही ...
बाबा मी तुमच्या पत्राची वाट बघणार  नाही  मी देशातल्या प्रत्येक मुलीच्या  पत्राची वाट बघतेय....................


                                                                                                             

                                                                                               तुमची लाडकी
                                                                                                   मुलगी

                                                                                               ( लेखक )
                                                                                       नवनाथ अंबादास ठोबरे
                                                                       छत्रपती शाहु कॉलेज ऑफ  इंजिनिअरिंग , औरंगाबाद