गुरुवार, २८ डिसेंबर, २०१७

ती सध्या काय करते...?हो तीच ती

ती सध्या काय करते...?
ती गर्भात असतानाच तपासली जाते..
एखादीच ती अनेक यातनातुन जन्म घेते..
ती हासते, बागडते आईच्या कुशीत
पण ते तीचे हसणे बागडणे कुशीतच संपते...
आणि वयाबरोबर बनत जाते ती आस्मीता, खानदान की ईज्जत वगैरे...
मग ती जीवंतपणी बनते गुलाम पुरुष नावाच्या प्राण्याची...
तो कधी बाप असतो, कधी भाउ असतो, कधी प्रीयकर असतो तर कधी नवरा...
हे सर्व तीला वापरतात आपले पुरुषी नाते आबादीत करन्यासाठी...
आणि हेच पुरुषी षंढ पुन्हा दुसर्या घरातील ती हल्ली काय करते विचारत रहातात...
हो पण ती थांबली नाहीये ती लढलीय आणि लढतेय देखील...
विनाकारण होनार्या स्पर्षासोबत, ती लढतेय छाताडावर टपलेल्या वासनांध नजरेसोबत, ती लढतेय खानदान की ईज्जत नावाखाली लाउन दिलेल्या लग्न नावाच्या टाकाउ परंपरेसोबत...
हल्ली ती काय करतेय...
ती सुनीता विल्यम्स झालीय
ती कल्पना चावला झालीय
ती सायना, सानीया झालीय
तरीही आपन तीच्यात सनीच शोधत विचारतो
हल्ली ती काय करते....
हल्ली ती फक्त गर्भातच नाही मारली जात
तर ती रोज मारली जातेय परंपरेने...
तीच्यावर कुठला एक नराधम नाही करत बलत्कार तर त्या नराधमाने केलेल्या बलत्काराची पायरी करुन चढतात तीच्यावर हजारो राजकीय ईमले...
हल्ली ती काय करते...
ती पल्लेदार, अस्मीतावाचक भाषनाचा ती विषय बनलीय...
मेलेल्या चीतेवर पोळ्या भाजन्यासाठी ती एक साधन बनलीय...
हो तीच आई, बहीण, मैञीण, प्रेयसी आणि बायको
रोज राञी समाजमान्य बलत्कार स्वीकारुन
जन्मदेतेय जाती,धर्म, फालतु आस्मीता, देव, दंगे यात गुरफटलेल्या क्रियाशुन्य भावनीक समाजाला....
हल्ली ती विनाकारण हसन्याचा प्रयत्न करते...
बापाच्या ईज्जतीसाठी नवर्याच्या छळाला सहन करत...
कारण तीचं अस्तीत्व दोन घराच्या बाहेरसुध्दा आहे याचा तीला कुणी विश्वासच देत नाहीये..
तीने काहीही केले तरी तीला विचारलेच जाते...
हल्ली ती काय करते....?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा