प्रिय बाबा , तुम्हाला पत्र
लिहायची वेळ येईल अस मला वाट्ल नव्हत ,कारण
तुम्ही घरी आले की दिवसभर जे काय घड्ल तुम्हाला
सांगायची सवय आहे, मला
लहानपणापासुन......
पण आज जे सांगायचय आहे ,
ते मी तुमच्याशी बोलू शकले नसते बाबा माझा जन्म झाला , तेव्हा आजी म्हणाली होती की
” पहिली बेटी आणि धनाची पेटी “
तुम्ही
सुध्दा हसला होतात पण मला माहिती आहे तुम्हाला खूप टेंशन आल होत , ते येणारच होत
कारण गरीब बापाच्या
घरात मुलगी जन्माला आली कि , त्या मुलीच्या
बापाला दोन एक्कर शेतीचा तुकडा तिच्या
नावे लिहूनच ठेवावा लागतो . तिच्या हुंड्याची
सोय म्ह्णुन.................
मराठी मध्ये एक
म्हण आहे की “ मुलगी एक ओझ असते, ते परक्याच धन असते ” मुलीच्या बापाला
अंगावर आलेला फोड जसा-जसा मोठा होत जातो , तेव्हा
तश्या वेदना आपली मुलगी मोठी होत असताना होतात.
बाबा तुम्ही कधी
दाखवल नाही पण तुम्हाला २४ तास माझ्या लग्नाची चिंता असते.. माझ्या लग्नाच्या
काळजीने तुम्ही बैल सुध्दा विकत घेतला
नाही पण चार वर्षापासून माझ्या करता एक बैल शोधत फिरताय.............
कुणासाठी बाबा आणि
का..................?
दादाने परिस्थितीला कंटाळून आत्मह्त्या केली , वाहिनी मात्र अजुन जगतेय मुली सांभाळत ,
परिस्थिती फक्त दादाला दिसत होती . वहिनीला फक्त
मुली दिसतात त्याचे भुकेले चेहरे
दिसतात. ती पण एक मुलगी आहे , आज नवरा अर्धवट साथ
सोडुन गेला तरी तिला तिच्या मुलीसाठी जगावच लागेल.
बाबा
....... मुलगी हि एक दावणीला बांधलेली गाय असते लग्नाआधी माहेरी आणि लग्नानंतर सासरी , सासरच्या लोकाना घरासाठी कुलदिपक हवा
असतो. मुलगा जरी वंशाचा दिवा
असला तरी मुलगी हि त्या दिव्याची वात आहे
कारण वात हि शांतपणे जळत राहते.
तुम्हीच बघा की आजवर
कित्येक बाप आपल्या मुलीला जन्माच्या अगोदरच मारून टाकतात ,कारण की त्यांना तिच्या हुंड्याची चिंता असते .......
पण खर सांगू बाबा .......
जगाच्या पाठीवर अशी एक राजमाता जिजाऊ होऊन गेली जिने
एक शिव –छत्रपती राजा घड्विला , त्या राजाने एक स्वत;चे हिंदवी स्वराज्य स्थापन केले. जगाच्या पाठीवर अशी एक आई होऊन गेली तिने
डॉ. बाबासाहेब आबेड्करासारखे
रत्न्न, जन्माला घातले कि त्या माणसाने या भारत देशाची राज्य घटना
लिहली. तर एक महिला महामहिम राष्ट्रपती
प्रतिभाताई पाटिल होऊ शकतात. तर प्रतिभाताई पाटिल याच्या व्यक्तिमत्त्वातुन भारतीय नारीला असा
संदेश मिळतो. भारतीय नारी तिला म्हणतात
“आले
गेलेल्याचा
आदर, जी करते सगळ्याची
कदर, जी घेते नेहमी
डोक्यावर पदर, तिलाच म्हणतात इंडियन मदर”
ह्या सर्व मुलीच
होत्या मग तुमच्या घरात मुलगी का नको ?
तुम्ही जाहिराती बघा मुलगी शिकली तर प्रगती झाली , तुमच्या प्रगतीसाठी
तुम्ही आम्हाला शिकवणार आमची इच्छा म्हणून
नाही, एक मुलगी शिकली तर सगळ घर शिकेन म्हणजे
मुलगी शिकुन काय करणार तर घरच्याना
शिकवत बसणार फक्त.......
तिला स्वत:च काहीच करिअर नाही. बाळाला वर्षभर दुध पाजा असे हक्काने म्हणतात ना
जाहिरातीत. मग मुलीला तिच्या अन्नासाठी
जगु द्या अस का नाही म्हणत. उद्या लग्नाला मुली मिळणार नाही म्हणुन मुली
वाचवा पण मुलगी जरी वाचवली ,
तिचा
हुंडा थोडीच वाचणार आहे तो तर द्यावाच लागणार आज पर्यत
कित्येक संसार उध्दस्त झाले या हुंड्यासाठी , किती तरी मुलीचे प्राण गेले . याला कोण जबाबदार आहे ,
खर तर
कायद्याने हुंडा देणे किंवा
घेणे बंदी आहे , पण
तरी ही घेतला जातो.
बाबा मी लहानपणी लग्नच करणार नाही अस म्हणायचे तर तुम्ही हसायचा
आणि म्हणायचे की नाहिस करायच
लग्न माझी बेटी माझ्याकडे
राहणार............. तुम्ही फक्त माझी समजुत
काढत होतात
पण आता तुम्ही फार घाई करताय माझ्या
लग्नाची ?
बाबा तुम्ही ५०रु मध्ये एक माठ आणला ना तर तो ४ ते ५
वर्ष थंड पाणी देतो आपल्याला पण ४ ते ५ लाख हुंडा देऊन तुम्ही जो माठ शोधताय ना तो कधी पाणी तरी
पाजणार आहे का तुम्हाला ..........जो मुलगा
माझ्या बापाचा कष्टाचा पैसा हुंडा म्हणुन घेणार आहे तर
त्याच्या गळ्यात मी फुल- हार कसा घालु.
आपल्या देशातील
सगळ्या मुलीनी ठरवलय की हुंडा देऊन आम्ही लग्न करणार नाही आता चार – दिड शहाने बैठकीला बसतील आणि आमची किमत ठरवतील पण आम्ही ते सहन करणार नाही.
आज मी पत्र लिहलय
उद्या या भारत देशातील प्रत्येक मुलगी
पत्र लिहणार आहे की, आम्ही हुंडा देऊन
लग्न करणार नाही ...
बाबा मी तुमच्या पत्राची वाट बघणार नाही
मी देशातल्या प्रत्येक मुलीच्या
पत्राची वाट बघतेय....................
तुमची लाडकी
मुलगी
( लेखक )
नवनाथ अंबादास ठोबरे
छत्रपती शाहु कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ,
औरंगाबाद
A pratim bhau ......
उत्तर द्याहटवाkhup chhan sir
उत्तर द्याहटवा