छोट्याशा विषाणू ने संपवली तुझी जगण्याची नशा
निसर्गावर मात करून मारलीस तू चंद्रावर उडी
निसर्गानेच बघ कशी जिरवली तुझी खोडी
मोठमोठ्या यंत्रामध्ये तू स्वतः ला गुंतवले
यंत्रांनी तुझे आता जगणे कसे संपवले
माणूस म्हणून माणसाला कधी दिला नाही वेळ
नाही राहिला माणसात आता जगण्याचा मेळ
पूर्वी म्हणे हात जोडून करायचे नमस्कार
आपलेच आता आपल्याचा करू लागले तिरस्कार
उच्च जीवन जगण्याच्या नादात माणूस झाला होता धुंद
निसर्गापुढे बघा झालेत कसे मंद
संपत्ती कमविन्याच्या पडले होते मोहात
सगळेच पडू लागले आता मृत्यूच्या डोहात
पशू पक्षी बंद करून ठेवले होते पिंजऱ्यात
तेच आता डोकावून पाह तात घराच्या उंबऱ्यात
एक मेकांच्या पुढे जाण्यात झाले होते मग्न
दवाखान्यात मोजू शकत नाही आता रुग्ण
खेड्यात आणि शहरात वाढू लागली दरी
आता कसे म्हणू लागलेत आपली खेडीच बरी
खेड्यातील लोकासाठी आटला होता प्रेमाचा झरा
आता सगळ्यांनाच वाटू लागले खेड्यातला माणूस बरा
नियतीने करून टाकला माणसाचा खेळ
कसा रे बसेल आता तुझ्या जगण्याचा मेळ
अंगा अंगात बघा भिनलाय आळस
टीव्ही आणि इंटरनेटने गाठलाय त्याचा कळस
सगळेच आता दान धर्म करण्याची भाषा बोलतात
परमेश्वरच आपला तारणहार म्हणून प्रार्थना करतात
माणसाला राहिली नाही आता माणसाची किंमत
प्रत्येकाने ठेवली पाहिजे घरात बसायची हिंमत
लेखक - नवनाथ ठोंबरे
औरंगाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा