शुक्रवार, २० एप्रिल, २०१८

मला वाटल इंजीनिअर व्हावं......

मला वाटल इंजीनिअर व्हावं
मला वाटल इंजीनिअर व्हावं
एखादी भरारी घेऊन विमानामध्ये  बसावं
आगीच्या त्या  यानात बसून पृथ्वीचे दर्शन घ्याव
पण इथले रस्ते भलतीकडे जातात
सगळ्या  पाउल वाटा Assignment  आणि Attendance वरच येतात
सगळेच काही कॉलेजमध्ये शिकण्यासाठी येत नाही
सगळेच काही कॅन्टीन ला चहा पिण्यास जात नाही
 राजा सोबत राणी असो  वा राणी सोबत राजा
थेअरी चालते जास्त इथे  practical तेवढे होत नाही
सगळ्याच प्राध्यापकांना कुठे आम्ही खडूस म्हणत असतो
 सगळेच लेक्चर्स कुठे आम्ही bunck करत असतो
आहो ज्ञानाची भूक मिटते जिथे त्या पंक्तीस आम्ही आवर्जून हजर असतो
मेकॅनिकल वाल्यानो अभियंत्याच्या भविष्याला
अभियंत्याच्या जीवनाला ऑईलिंगची गरज आहे
computer वाल्यानो system कोडिंग थोडी बदलण्याची  गरज आहे
civil वाल्यानो पाया असेल मजबूत तेव्हा शिखर दिसेल आमचे 
चुकलेले Circuit  थोड  दुरुस्त करण्याची गरजेचे आहे
अभियंत्याचे स्वराज्य जर घडवाच असेल तर
अभियंत्यातला छत्रपती राजे तेवढे जागे होणे गरजेच आहे  
                             ( नवनाथ ठोंबरे  संभाजीनगर )

1 टिप्पणी: